मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. आधी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी नंतर त्यांनी माफी मागावी अशी मागणी सभागृहात केली. त्यांनतर भास्कर जाधव यांनी विधानसभेत बिनशर्त माफी देखील मागितली. या मुद्द्यावरून वाद सुरू असताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध
भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. “अध्यक्ष महोदय, आपल्याकडून इतक्या गंभीर विषयावर निर्णय अपेक्षित आहे. ही प्रथा अतिशय वाईट आहे. भास्कर जाधव यांची ही काही पहिलीच वेळ नाही. विधानसभेच्या बाहेर तुम्ही एखाद्या नेत्याची नक्कल केली, तर ती आपल्या लोकशाहीत माफ करण्यायोग्य नाही, पण त्याचा निर्णय निवडणुकीत होईल. पण विधानसभेत असं काही करणं, चुकीचं आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.
“याआधी १८ डिसेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांविषयी सामनामधलं एक भाषण वाचत होते. अध्यक्ष म्हणाले, असं वाचता येणार नाही. कारण ते नेते आहेत. त्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांबद्दल एका हिंदू वृत्तपत्राने काहीतरी शब्द वापरले, तर अध्यक्ष म्हणाले हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. मग पंतप्रधानांबद्दल बोललं, तो देशाचा अपमान होत नाही का? त्यानंतर अध्यक्ष म्हणाले, सभागृहापेक्षा कुणी मोठा नाही. मग हे सदस्य सभागृहापेक्षा मोठे आहेत का?”, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
“अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील. मी तुम्हाला शब्द देतो, की हे रेकॉर्डमधून काढलं नाही, तर यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो. हे काय नकला करतात. आमच्यावर संस्कार आहेत. अशांना आम्ही पुस्तकं दाखवतो. हे असं खोटं बोल पण ठरवून बोल, काहीतरी गोंधळ करायचा हे असं नाही चालत. तुम्ही तर्कावर तर्क द्या. हे असं नाही चालणार”, असं मुनगंटीवारांनी म्हणताच विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
Read also:
- अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील – गोपीचंद पडळकर
- एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांसारखी झालीय, कामगार आत्महत्येच्या मनस्थितीत – गुणरत्न सदावर्ते
- विधानसभेत उडाल्या `क्राॅस कनेक्शन`च्या ठिणग्या; नितीन राऊतांना टार्गेट करताना पटोलेंनी दिली फडणवीसांना साथ
- परीक्षा घोटाळ्यावरून फडणवीस-पटोलेंमध्ये वाद; फडणवीस म्हणाले यंत्रणा सडलेली, पटोले म्हणाले कराचं चौकशी..
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींचा फोन..