कोल्हापूर : मागील काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदीता माने, खासदार धैरशील माने, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि इतरही दिग्ग्ज नेत्यांनी जिल्हा बँकेकरिता एकमेकांच्या सोबत तर काहींनी विरोधात शड्डू ठोकले होते.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेसाठी ज्यांना उमेदवारी निश्चित झाली आहे त्या उमेदवारांनी पहिलेच आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी पॅटर्न यशस्वी होणार असं वाटत असतानाच अचानक शिवसेनेने सत्ताधारी गटाशी फारकत घेतली आहे. सत्तारूढ गटाच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सत्तारूढ गटाकडून दिग्ग्ज नेते जिल्हा बँकेसाठी मैदानात उतरले आहेत. गडहिंग्लजमध्ये सत्तारूढ गटाच्या प्रचार शुभारंभाला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवडे, पी. एन. पाटील अशी दिग्ग्ज मंडळी उपस्थित राहणार आहे.
फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली – भास्कर जाधव
सत्ताधाऱ्यांनी जागांचा प्रस्ताव नाकारलेल्या शिवसेनेने त्यांच्यापासून फारकत घेत अचानक नव्या पॅनेलचीच घोषणा केली. या पॅनेलमध्ये त्यांनी शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय गटाला जोडीला घेतले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर अशी मंडळी सत्ताधिकाऱ्यांनी नाकारलेल्या विरोधी पॅनलमध्ये आहे. कोल्हापुरात दोन वर्षांनंतर शिवसेना विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.
Read also:
- फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
- माजी मंत्री अनिल राठोडांच्या पुत्रास विधानसभेच्या उमेदवारीवरून जीवे मारण्याची धमकी; अहमदनगर शहरात खळबळ
- “हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात
- पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
- …तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य