मुंबई : काल हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. यावेळी हिवाळी अधिवेशन हे वादळी ठरणार यांची कल्पना विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला होती. झालेही तसेच. पहिल्याच दिवशी विविध मुद्यांवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं.
आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला. अखेरीस त्यांना आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली. त्याआधी वीजबिलाच्या मुद्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ लाख रुपयांच्या घोषणाचा उल्लेख केला.
उर्जामंत्री डॉ.@NitinRaut_INC साहेबांनी भाजपच्या नेत्यांना नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार!
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis साहेब, आपल्याला हवा असलेला व्हिडिओ मी शेअर करतोय, आपण आवर्जून पहा व शेअर करायला विसरु नका!#जनहितार्थ_जारी pic.twitter.com/QBh2KWnUMY— Satyajeet Tambe (@satyajeettambe) December 22, 2021
वीजबिलाच्या मुद्यावर विरोधी पक्षाने राऊत यांना घेतल्याने भास्कर जाधव त्यांच्या मदतीला आले होते. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा पुरावा देता आला नाही. हा पुरावा नंतर काँग्रेसचे महाराष्ट्र युवकचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मात्र मोदी हे बोलले होते असं म्हणत आपल्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.
त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणााचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला, यामध्ये ते १५ लाख रुपयांचा उल्लेख करत असल्याचे सांगितले. तांबेनी म्हटले आहे की ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदींच्या वक्तव्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद देतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला हवा असलेला व्हिडिओ मी शेअर करतोय, आपण आवर्जून पहा व शेअर करायला विसरु नका! #जनहितार्थ_जारी आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. हे ट्विट आता कमालीचं व्हायरल होत आहे.
Read also:
- माजी मंत्री अनिल राठोडांच्या पुत्रास विधानसभेच्या उमेदवारीवरून जीवे मारण्याची धमकी; अहमदनगर शहरात खळबळ
- “हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात
- पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
- …तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
- फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली – भास्कर जाधव