मुंबई – ‘ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एक मस्त गृहस्थ आहेत. शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत. मदमस्त असा उल्लेख करणे त्या मंडळींना असंसदीय वाटू शकेल. अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर शिवसेनेने निशाणा साधला आहे. अमित शहा या आठवड्यात दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेला राज्य सरकारवर टीका करत इशारे दिले. अमित शहांच्या या पुणे दौऱ्यावर शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टार्गेट करत ताशेरे हल्लाबोल केला आहे.
महादेव जानकारांचा नवा शोध; म्हणाले, शिवाजी महाराजही ओबीसी होते
गृहमंत्री अमित शहांची पाठ वळताच चंद्रकांतदादा पाटील वगैरे महामस्त नेत्यांचे बोबडे बालीश बोल सुरू झाले. ‘मोदी हे फारच संयमी नेते आहेत. नाहीतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायला वेळ लागणार नाही!’असे चंद्रकांत पाटील म्हणतात ते कशाच्या आधारावर? असा सवाल करत शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एक मस्त गृहस्थ आहेत. शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत. मदमस्त असा उल्लेख करणे त्या मंडळींना असंसदीय वाटू शकेल. त्यामुळे महामस्तच बरे. शहा यांनी पुण्यात येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला. त्यावर लगेच महाराष्ट्रातील महामस्त पुढाऱ्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा सुरू केली. काही झाले की राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी द्यायची. देशाचे घटनात्मक प्रमुख जणू त्यांच्या घरीच रबर स्टॅम्प घेऊन बसले आहेत, ” असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
नाशिकमध्ये 6 नगरपंचायतींच्या मतदानाकडे नागरिकांनी फिरवली पाठ..
अमित शहांनी शिवसेनेला आव्हान देण्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. अशीच आव्हानाची भाषा त्यांनी प. बंगालात केली होती. तेथे काय झाले? भाजपास दारुण पराभव पत्करावा लागला. कालच्या कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत तर भाजपास दहा जागाही जिंकता आल्या नाहीत. आता तेथेही राष्ट्रपती राजवट लावणार काय? असा सवालही शिवसेनेने केला आहे.
इतकेच नव्हे तर, 2014 साली ते स्वतः अध्यक्ष असतानाच त्यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेशी नाते तोडले होते. तेव्हा शिवसेना एकटय़ानेच लढली होती. शिवसेनेला एकटय़ाने लढण्याची, अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन लोळविण्याची सवय आहे व लढण्यासाठी शिवसेनेला तपास यंत्रणांची ‘चिलखते’ वापरावी लागत नाहीत, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. अशा शब्दांत शिवसेनेने अमित शहांवर टीकास्त्र डागले आहे.
Read also:
- हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची पहिलीच मागणी अजित पवारांनी केली मान्य..
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी; ७० हजार कर्मचारी अजूनही संपावर ठाम
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
- सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध