परभणी – राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांचा नवा जावईशोध आहे. शिवाजी राजाही ओबीसी होता, असे आश्चर्यचकित करणारे विधान त्यांनी केले. ते परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच त्यात आता महादेव जानकर यांनीदेखील असेच विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी जानकर यांनी मराठा, ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली.
ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
इतकेच नाही तर आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन करताना मराठा, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो, असे आश्वासन त्यांनी दिले. “आमचं होऊ द्या ३०-३५ आमदार, १० मिनिटांत ओबीसीची गंमत करून टाकतो. मराठ्यांना पण आरक्षण देऊ शकतो अन् मुसलमानांनाही आरक्षण देतो. मुसलमानांवर तर किती अन्याय आहे? गॅरेज बघितलं का मुसलमान, आंब्याचं दुकान बघितलं का मुसलमान, कोंबडीचं दुकान बघितलं की मुसलमान, त्याचा कुठं कलेक्टर नाय, काय नाय, बोंबा बोंब, टोपी घालून केळं विकतंय, फळं विकतंय अन् त्या मुसलमानाला लोक शिवा देतेत, हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू बी भिकारी अन् मुसलमान बी भिकारी अन् राज्य चालवणारा तिसराच असतो, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ” असं महादेव जानकर यावेळी म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की, “मराठा समाजाला माझी विनंती आहे, शाहू महाराजांनी ह्या देशात आरक्षण दिले.
“ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा
मराठ्यांना आरक्षण दिले, पण नंतर आरक्षण का गेले? शिवाजी राजादेखील ओबीसी होता. कुळवाडी भूषण राजा होता. आमच्यातल्या तथाकथित लोकांना वाटले, आम्ही लय मोठं हाय गावचे, आम्हाला नको तसले आरक्षण. आणि आज अवस्था काय आहे?”
Read also:
- मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध
- राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार
- पाठीत खंजीर खुपसला तर तो उलटा फिरवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा
- पेपरफुटी प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला अटक
- शिवसेनचं ठरलंय ; ‘या’ दिवशी सामील होणार युपीएत