पुणे : महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून विविध सरकारी भरत्यांसाठी लेखी पेपर घेण्यात आले आहेत. यामध्ये म्हाडा, टीईटी, आरोग्य विभाग या परीक्षेचा समावेश होता.या तिन्ही परीक्षांना पेपर फुटीचा फटका बसला आहे. पेपरफुटी प्रकरणातमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. टीईटी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज
आता आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे नेते, भाजप युवा मोर्चाचा पाटोदा येथील माजी अध्यक्ष संजय सानप याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून पेपरफुटी प्रकरणामध्ये संजय सानप याची चौकशी चालू होती. पेपर फुटी प्रकरणात त्याचा सहभाग आढळून आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. आता २३ डिसेंबरपर्यंत संजय सानपला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
“टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी”; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
पेपरफुटी प्रकरणापासून सुरु झालेल्या घोटाळ्यामध्ये आता एक एक नवीन खुलासे समोर येत आहेत. घोटाळे सामोरे येण्याची ही फक्त सुरुवात आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले होते. दरम्यान पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले आहे. तर याहून धक्कादायक बाब म्हणजे सानप याने त्याच्या बीड मधील मूळ गावातील अनेक मुलांना नोकरीला लावले असल्याची माहिती समोर आली आहे.
Read also:
- शिवसेनचं ठरलंय ; ‘या’ दिवशी सामील होणार युपीएत
- ५४ दिवसांपासून चालेलला संप अखेर मागे; लाल परी पुन्हा एकदा धावणार रस्त्यावर
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘या’ चार नगरपंचायतीसाठी होणार मतदान; राणे विरुद्ध शिवसेना नेतृत्वाचा लागणार कस
- ‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’
- गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या..