नाशिक – नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या मतदानाची प्रक्रिया अतिशय शांत आणि थंड सुरू आहे. त्यातही नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट असल्यामुळे नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदानाकडे अक्षरशः पाठ फिरवली. दुपारच्या सत्रात हे मतदान वाढण्याची आशा आहे. निफाड नगरपंचायतीसाटी तर सकाळी साडेनऊपर्यंत सहा टक्केही मतदान झाले नव्हते. जिल्ह्यातील बहुशांत ठिकाणीही नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.
दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या; रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका
दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगला आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडमध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होतेय. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होत आहे.
तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार; आर. आर. पाटलांच्या मुलाच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
नाशिकमध्ये सध्या थंडीची लाट सुरू आहे. उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासूनचे थंड वारे थेट नाशिकच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे निफाडचे तापमान काल 8.5 अंश सेल्सिअस होते. आज ते 9.5 अशं सेल्सिअस आहे. त्यामुळे निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी सकाळीही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. नाशिकमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या मतदानाकडे नागरिकांनी सकाळच्या सत्रात पाठ फिरवली
Read also:
- महापालिका निवडणुक लांबणार; प्रभाग प्रारुपातील संभ्रमामुळे पालिका पुन्हा आपली बाजू मांडणार
- मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध
- राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार
- पाठीत खंजीर खुपसला तर तो उलटा फिरवायला वेळ लागणार नाही; राजू शेट्टींचा सतेज पाटलांना इशारा
- पेपरफुटी प्रकरणात भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला अटक