मुंबई : सध्या मुंबईकरांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयातील एका ग्रॅनाईटबोर्डचा फोटो कमालीचा व्हायरल होत आहे. यामध्ये नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की तमाम हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल नितेश राणे यांना उत्तर दिलं होतं. कोणीतरी जाणून बुजून राणीच्या बागेच्या बाबतीत अफवा पसरवत आहे. याठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
“हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात
आता शिवसैनिक देखील नितेश राणेंच्या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करत दोन समाजात तेढ निर्माण केली असल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तमाम #हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSena चं नाव बदलणार का? @UdhavThakre @mybmc pic.twitter.com/kjh2LAVCQp
— nitesh rane (@NiteshNRane) December 22, 2021
भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाविरुद्ध मागील काळात आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिक हे राणे यांच्या विरोधात मुंबईमध्ये आक्रमक झाले आहेत. नितेश राणे हे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एका मागून एक आरोप करत आहेत. शिवसेनेच्या कोणत्याही बड्या नेत्याने राणेंच्या विरोधात वक्तव्य केले नसले तरी शिवसैनिकांनी मात्र नितेश राणेंच्या विरोधात थेट भूमिका घेतल्याने आता वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read also:
- अनिल परब आणि नितेश राणेंमध्ये सभागृहात हमरीतुमरी; फडणवीसांच्या मध्यस्तीनंतर वाद मिटला
- मुश्रीफ-घाटगे संघर्षाला समझोत्याने ब्रेक; कार्यकर्ते ‘या’ सेटलमेंटच्या राजकारणातून धडे घेणार का ?
- मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होऊन प्रचाराला सुरुवात; जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज नेत्यांचा कस लागणार
- फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला