राजापूर : एसटीच्या संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्यात आलेले राजापूर आगारातील चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते (३५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.
मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
गेले काही दिवस राज्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संप मागे घेऊन कामावर हजर व्हा, असे सातत्याने आवाहन शासनाकडून होत आहे. सेवेत हजर न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजापूर आगारातील सुमारे २० आणि २५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामध्ये गेली चार वर्षे चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते यांचाही सामावेश होता.
मुश्रीफ-घाटगे संघर्षाला समझोत्याने ब्रेक; कार्यकर्ते ‘या’ सेटलमेंटच्या राजकारणातून धडे घेणार का ?
१० डिसेंबरला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते तणावाखाली होते अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली. अत्यावस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रात्री १०.३० दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. राकेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील होते. गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. पत्नी व दोन मुलांसह राजापुरात रहात होते.
Read also:
- …तर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन – जितेंद्र आव्हाड
- …तर मलाही सभागृहाच्या बाहेर काढा; विधानभवनात अजित पवारांचा संताप
- ओबीसींच्या जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
- मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; ‘त्या’ ट्वीट विरोधात काळाचौकी पोलिसांत तक्रार
- अनिल परब आणि नितेश राणेंमध्ये सभागृहात हमरीतुमरी; फडणवीसांच्या मध्यस्तीनंतर वाद मिटला