कोल्हापूर : मागील काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदीता माने, खासदार धैरशील माने, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि इतरही दिग्ग्ज नेत्यांनी जिल्हा बँकेकरिता एकमेकांच्या सोबत तर काहींनी विरोधात शड्डू ठोकले होते.
…तर मलाही सभागृहाच्या बाहेर काढा; विधानभवनात अजित पवारांचा संताप
आता शिवसेनेच्या नेत्त्यांनी वेगळी चूल मांडत दुसऱ्या स्वतंत्र आघाडीची घोषणा केली होती. माजी खासदार निवेदिता माने, खासदार संजय मंडलिक यांनी आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी प्रचारात आघाडी घेतली आहे. एवढंच नाही तर शिवसेना नेत्यांनी थेट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य नेत्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात ठाकरेंचे सरकार आहे. कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जी सत्तेच्या जीवावर मौज मजा करत आहेत.
…तर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन – जितेंद्र आव्हाड
शिवसेनेच्या जीवावर आमदार, खासदार आणि आता थेट मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. आत्ता शिवसेनेला सोडून विरोधकांसोबत जावून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लढवणाऱ्यांना लाज वाटल पाहिजे, अशी जळजळीत टिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली.
आणखी एक बळी: निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हाच फॉर्म्युला जिल्हा बॅंकेत राहिले असे पहिल्यापासून सांगितले जात होते. पण, प्रत्यक्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोडून भाजपशी मिळते जुळते घेवून शिवसेनेला धोका दिला आहे. जिल्हा बॅंकेत किती आणि कोणती जागा असावी हे ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मातोश्रीवरूनच याची घोषणा होईल. पण शिवसेनेचे उमेदवार कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेचे नेते ठरवत असतील हे चालणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- राज्यात पुन्हा एकदा लागणार ‘निर्बंध’; रात्रीची जमावबंदी, नवीन नियमावली होणार आज जाहीर
- शिवसेनेची अवस्था ‘म्याव म्याव’ सारखी झाली आहे; आमदार नितेश राणेंचा घणाघात
- शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी; विरोधकांनीही दिला पाठींबा
- ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो – छगन भुजबळ
- करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; नावही जाहीर, पण पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या