मुंबई : मागील दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीने सर्वसामान्य लोकांचे जगणे हराम करून ठेवले होते. आता पुन्हा एकदा देशावर ओमायक्रॉन या विषाणूची सावट गडद झाले आहे. आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत याबाबत नियमावली जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओबीसींच्या जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
गेल्या २४ तासांमध्ये मुंबईमधील ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ करोनाबाधित आढळले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना तज्ज्ञ गटाशी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे चर्चा केली आहे. त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे.
…तर मलाही सभागृहाच्या बाहेर काढा; विधानभवनात अजित पवारांचा संताप
याबाबत आज सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्री ठाकरे हे पुन्हा करोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
…तर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन – जितेंद्र आव्हाड
नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर ओमायक्रॉनचे सावट आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण हे आता झपाट्याने वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली होती. मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत आणि करोनाबाधितांचे प्रमाण, रुग्णदुपटीचा दर यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. तसेच निवडणुका तोंडावर आलेल्या राज्यांत लसीकरण मोहिमेला वेग देण्याची सूचना केंद्राने केली.
Read also:
- शिवसेनेची अवस्था ‘म्याव म्याव’ सारखी झाली आहे; आमदार नितेश राणेंचा घणाघात
- शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी; विरोधकांनीही दिला पाठींबा
- ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो – छगन भुजबळ
- करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; नावही जाहीर, पण पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या
- आणखी एक बळी: निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू