मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. त्यानुसार २७ डिसेंबरला या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर २८ डिसेंबरला निवडणुकीसाठीचे मतदान पार पडेल. या निवडणुकीत भाजपकडूनही आपला उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला महाविकासआघाडी आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; नावही जाहीर, पण पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या
यावेळी विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी करण्यात आली. अनेक प्रश्नांवर राज्य सरकारने अद्याप उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, असे विरोधकांचे म्हणणे होते. मात्र, राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २८ डिसेंबरला संपेल.
ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो – छगन भुजबळ
याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजासाठी आजचा दिवस धरुन एकूण तीन दिवसच हातात उरतात. इतक्या कमी कालावधीत जनतेच्या समस्या कशा मांडणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
Read also:
- ५ राज्यांमध्ये निवडणूका पुढे ढकलण्यामागे भाजपचा मोठा डाव; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
- आमच्या जीवावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चैन सुरु; कोल्हापुरात शिवसेनेची विरोधकांवर जहरी टीका
- राज्यात पुन्हा एकदा लागणार ‘निर्बंध’; रात्रीची जमावबंदी, नवीन नियमावली होणार आज जाहीर
- शिवसेनेची अवस्था ‘म्याव म्याव’ सारखी झाली आहे; आमदार नितेश राणेंचा घणाघात
- शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी; विरोधकांनीही दिला पाठींबा