– शिंदे, फुगे आणि गवळी यांना न्याय देण्याचे आव्हान
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपाला खिंडार पडणार असून, भोसरीतील नाराज नगरसेविका प्रियांका बारसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, बारसे यांच्या प्रवेशामुळे याच प्रभागातून संभाव्य इच्छुक असलेले माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, युवक उपाध्यक्ष योगेश गवळी, अमर फुगे यांच्यासह विद्यमान नगरसेविका अनुराधा गोफणे यांना न्याय कसा द्यायचा? याचे आव्हान नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यासमोर राहणार आहे.
भोसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चला हवा येऊ द्या’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला भाजपामधील नाराज नगरसेविका प्रियांका बारसे यांनी जाहीरपणे हजेरी लावली. विशेष म्हणजे, कार्यक्रम संपल्यानंतर नगरसेविका बारसे यांनी ‘‘आठवत नाही मी एवढी कधी हसले होते?’’ असा सूचक संदेशही व्हाट्सॲप स्टेटस आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
यापूर्वी, अजित गव्हाणे यांच्या पुढाकाराने झालेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ओळखपत्र वितरण सोहळ्यातही नगरसेविका बारसे व्यासपीठावर उपस्थित होत्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बहुदा अजित गव्हाणे यांच्या कार्यक्रमात दिसणाऱ्या नगरसेविका बारसे या भाजपाला रामराम ठोकणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यात पुन्हा एकदा लागणार ‘निर्बंध’; रात्रीची जमावबंदी, नवीन नियमावली होणार आज जाहीर
पण, बारसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अजित गव्हाणे यांच्यासमोर प्रभागात तिकीट वाटप करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत स्वत:सह अन्य दोन उमेदवारांनाच गव्हाणे यांना संधी देता येणार आहे. बारसे यांनी प्रवेश केल्या विद्ममान नगरसेविका म्हणून त्यांना पहिले प्राधान्य द्यावे लागणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या विद्ममान नगरसेविका अनुराधा गोफणे, माजीनगरसेवक जालिंदर शिंदे, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष योगेश गवळी आणि मागील निवडणुकीत अजित गव्हाणे यांच्या पॅनेलमध्ये असलेले अमर फुगे यांनाही न्याय द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे अजित गव्हाणे यांना बंडखोरी थोपावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. त्यामुळे भाजपा प्रियांका बारसे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात ‘भरभरुन हसल्या’ अन् अजित गव्हाणे यांच्या अडचणी वाढल्या… असे चित्र निर्माण झाले आहे.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
- विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल
- नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार
- ५ राज्यांमध्ये निवडणूका पुढे ढकलण्यामागे भाजपचा मोठा डाव; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
- आमच्या जीवावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चैन सुरु; कोल्हापुरात शिवसेनेची विरोधकांवर जहरी टीका