मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कायम असूनही विधानसभेत मंत्री, आमदार विनामास्कचे फिरत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरुवारी विधानसभेत बेजबाबदाऱ्यांना शाब्दिक चपराक दिली. या गोष्टीला २४ तासही उलटले नाहीत, तेच शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी मास्क न लावता विधान भवनात आले. माध्यमांचे कॅमेरे आपल्याकडे वळल्याचे पाहून शिंदेंनी ‘पीए’कडून मास्क घेतला आणि तोंडाला बांधून विधिमंडळात गेले. काही आमदारांनी विधानसभेत मास्क घातला नसल्याकडे अजित पवारांनी पुन्हा लक्ष वेधले आणि मास्क घालण्याची विनंती केली.
“बाप काढणं ही आव्हाडांची संस्कृती; माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार?”
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लसीकरण आणि कोरोना चाचणीशिवाय विधिमंडळात प्रवेश नाही. मात्र, सभागृहातील बहुतांश मंत्री आणि आमदारांनी मास्क घातले नसल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या आवारात मास्क न घालणाऱ्या मंत्री आणि आमदारांच्या बेशिस्तपणाकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी गुरुवारी सभागृहात नाराजी व्यक्त केली.
मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; ‘त्या’ ट्वीट विरोधात काळाचौकी पोलिसांत तक्रार
मास्क नसेल तर मला आत घेऊ नका, असे सांगत पवारांनी काळजी घेण्याचे सगळ्यांना आवाहन केले. त्यामुळे शुक्रवारपासून विधिमंडळात येणारे मंत्री, आमदार आणि अन्य सदस्यांनी मास्क घालूनच येणे अपेक्षित होते. मात्र, आज विधान भवनाच्या प्रवेशद्वारात आलेल्या एकनाथ शिंदे यांचा मास्क नव्हता. विधानसभेत माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे शिंदे यांना टिपत होते. लगेच सावध होऊन एकनाथ शिंदे यांनी ‘पीए’कडून मास्क घेतला आणि विधिमंडळात गेले.
Read also:
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे – नाना पटोले
- भाजपाच्या प्रियांका बारसे ‘भरभरुन हसल्या’ अन् राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंच्या ‘अडचणी वाढल्या’!
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
- विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल
- नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार