मुंबई – विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत अध्यक्षांच्या निवडणुकीसह कोरोना, पेट्रोल-डिझेलचे दर यावरून जोरदार चर्चा झाली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि राज्यातील इंधन दरावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.
आणखी एक बळी: निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पेट्रोलच्या दरावरून बोलताना आंध्र प्रदेश, गुजरात, आसामधील पेट्रोलचे दर सांगत मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील पेट्रोलच्या दराशी तुलना केली. शेजारची राज्य जर दर कमी करू शकतात तर महाराष्ट्र का करू शकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपली आई, आजी, आजोबा इतरांकडून, शेजारच्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याचे सांगतात. ते कधीच वाईट शिकवत नाहीत. मग पेट्रोल दराबाबत असं अनुकरण करायला नको का, असा टोला मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना लगावला.
करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; नावही जाहीर, पण पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर 22 राज्यांनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. देशाला, अमेरिकेसमोर आर्थिक अडचण आहे. फक्त महाराष्ट्रालाच अडचण नाही. राज्यात मात्र पेट्रोलचा एकही पैसा कमी करणार नाही ही भूमिका लोकांच्या हातात पेट्रोलची बाटली दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला दिला.
Read also:
- महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही – अजित पवार
- कामगार न्यायालयाचा संपकऱ्यांना दणका; ‘त्या’ कर्मचाऱ्यांची सेवेतून केली तात्काळ हकालपट्टी
- “…नाही तर कोर्टात जाईल”; रामदास कदम यांचा आघाडी सरकारला घरचा आहेर
- काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला मुर्ख समजून नये; खासदार इम्तियाज जलील संतापले
- रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून अडवलं; पोलिसांनी गेटवरचं रोखलं