मुंबई – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादग्रस्त सुरु झाला. विरोधक आणि सत्ताधारी यांमधील आक्रमक पवित्र लक्षात घेता संपूर्ण वातावरण तापलेले पाहायला मिळाले. यातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधिमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत बसलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे याना पाहून म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या. यावरुन सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. यावरुन आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे – नाना पटोले
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया देत नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या कि, नितेश राणेंनी जेव्हा म्याव म्यावची प्रतिक्रिया दिली त्यावर आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरुनच त्यांचा सुसंस्कृत आणि असंस्कृतपणा तिथे स्पष्ट दिसला. शिवसेनेला वाघ असंच म्हंटल जात. त्यामुळे आदित्या ठाकरेंना पाहून राणेंना भीती वाटली असेल म्हणून त्यांनी पटकन एक प्रतिक्रिया म्याव म्याव दिली असेल तर माहिती नाही, अशी प्रतिक्रिया देत किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंना सुनावले आहे.
अजित पवारांनी काल विधानसभेत चपराक लगावून सुद्धा एकनाथ शिंदेनी केली गडबड.
विधान भवनाच्या पायरीवर बसून विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. आमदार नितेश राणेदेखील यामध्ये सहभागी होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन , परीक्षा घोटाळा, या मुद्द्यांवरून सरकरविरोधात घोषणाबाजी केली जात होती. यावेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले त्यावेळी, नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ अशा घोषणा दिल्या. यावर भाजप नेते हसले देखील.
Read also:
- “मला बदनाम करण्याचा प्रयत्न”; रामदास कदमांच्या आरोपावर वैभव खेडेकरांची प्रतिक्रीया
- “त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच”; पेपरफुटीप्रकरणावरून अजित पवारांचा इशारा
- सायबर पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
- फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांचे समन्स
- “महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा