सातारा – सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभेवरील खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा जावळीचे भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसतोय. नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही राजेंनी विकासकामांचा धडाका सुरु केलाय. पण या विकासकामांच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमांमधूनही दोन्ही नेते एकमेकांवर टीका टीप्पणी करताना दिसत आहेत. शुक्रवारीच उदयनराजे भोसलेंनी ‘काय बाई सांगू कसं गं सांगू’ गाणं म्हणत शिवेंद्रराजेंवर निशाणा साधल्यानंतर आज शिवेंद्रराजेंनी या टीकेला उत्तर दिलंय.
“अजितदादा, तुम्ही शेजाऱ्यांचे अनुकरण करा!”; सुधीर मुनगंटीवार यांनी साधला निशाणा
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्याकडून एकमेकांवर नारळफोड्या आणि घरफोड्या अश्यापद्धतीच्या टीका केल्या जात आहेत. या टीका टीप्पण्यांमुळे सातारा पालिकेच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. कालच सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी उदयराजेंनी शिवेंद्रराजेंना चर्चेसाठी या असं आवाहन केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी गाण्याच्या माध्यमातून शिवेंद्रराजेंवर निशाणा साधला. “काय बाई सांगू? कसं गं सांगू मलाच माझी वाटे लाज. काहीतरी मला झालंय आज”, अशा ओळी म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला तेव्हा सभागृहामध्ये एकच हशा पिकला
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही – अजित पवार
काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधताना उदयनराजेंना नारळफोड्या गँग असं म्हटलं होतं. उदयनराजेंच्या हस्ते सातऱ्यामध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनांच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंनी हा टोला लगावलेला. यावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना फटकारलं होतं. आम्ही नारळ वाढवून लोकांसाठी चांगली काम करतोय मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केलंय, असा टोला उदयनराजेंनी लागवला.
Read also:
- शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट..!
- फडणवीसांना समन्स बजावल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- वाघाला पाहून नितेश राणेंच्या तोंडातून म्याव- म्याव आलं असेल; किशोरी पेडणेकरांची खोचक टीका
- “मला बदनाम करण्याचा प्रयत्न”; रामदास कदमांच्या आरोपावर वैभव खेडेकरांची प्रतिक्रीया
- “त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच”; पेपरफुटीप्रकरणावरून अजित पवारांचा इशारा