मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हापासून भाजप -मनसे युतीच्या चर्चा रंगल्या आहे. हे पाहता आता भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही मनसे आमदार राजू पाटील यांची त्यांच्या कार्यलयात जाऊन भेट घेतली.त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.
रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून अडवलं; पोलिसांनी गेटवरचं रोखलं
मनसे आमदार राजू पाटील हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जन आशिर्वाद यात्रेत सहभागी झाले होते. राजू पाटलांनी कपिल यांच्या समर्थनार्थ ‘पाटील दिल्ली गाजवतील’, असे बॅनर लावत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
इतकेच नाही तर डोंबिवलीतील मनसेच्या नवीन कार्यलयाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजप नगरसेवक राहुल दामले यांनी भेट दिली होती. तर काल रात्री भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यलयात जाऊन भेट घेतल्याने पुन्हा युतीच्या चर्चा रंगल्या.
काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला मुर्ख समजून नये; खासदार इम्तियाज जलील संतापले
राजू पाटील यांनी शिवेंद्रराजेंसोबत झालेल्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले. खार्डी गावात दिवंगत रतनबुवा स्मृती चषक प्रस्तुत खार्डी चषक व नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही देशातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा भरवली होती,त्या अंतिम सामना पाहण्यासाठी आणि बक्षीस वितरणासाठी आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या ठिकाणावरून जवळच माझे घर आणि कार्यलय असल्याने मी त्यांना आमंत्रण दिले आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारले आणि आम्ही भेटलो. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे पाटील म्हणाले.
Read also:
- फडणवीसांना समन्स बजावल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- वाघाला पाहून नितेश राणेंच्या तोंडातून म्याव- म्याव आलं असेल; किशोरी पेडणेकरांची खोचक टीका
- “मला बदनाम करण्याचा प्रयत्न”; रामदास कदमांच्या आरोपावर वैभव खेडेकरांची प्रतिक्रीया
- “त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच”; पेपरफुटीप्रकरणावरून अजित पवारांचा इशारा
- सायबर पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले