मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पहिल्या दिवसाप्रमाणेच वादळी ठरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे देखील सहभागी झाले होते.
राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ठाकरे सरकारची माहिती
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे यावेळी विधिमंडळात प्रवेश करत होते. आदित्य ठाकरेंना पाहून लगेचच नितेश राणे यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव म्याव म्याव’ अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणेचे पडसाद तिसऱ्या दिवशी विधानसभवनात चांगलेच उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सर्वांनीच आमदार नितेश राणे यांचे ‘म्याव म्याव’ वरून कान टोचले आहेत.
धक्कादायक..! अधिवेशन सुरु असताना विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
विरोधी पक्षनेते यांनी सभागृहाचा कालावधी सुरु झाल्यानंतर म्हटले आहे की कोणत्याही नेत्याने कोणाचीही नक्कल सभागृहात करणे योग्य नाही. या मुद्यांवरून सभागृह तहकूब होते त्यामुळे कोणीही असे प्रकार जाणून बुजून करू नयेत असं फडणवीसांनी म्हटलं आहे. सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हे कृत्य चांगलं नाही असं म्हटलं आहे. यापुढे सभागृहात असले प्रकार, नक्कला घडणार नाही अशी भूमिका सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतली आहे.
Read also:
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो; एसटी कामगारांवरून पडळकर बरसले
- महाराष्ट्रातील निवडणुकांवर ओमिक्रॉनचे सावट; विधासभेत चर्चा निवडणूका पुढं ढकलणार ?
- विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’; अजित पवार नेमके कुणावर भडकले?
- विधानसभेत शिवसेना आमदारानेच जाहीर केली मुख्यमंत्र्यांवरची नाराजी…
- ‘रेसिडेन्सिअल कॉरीडोर ते इंडस्ट्रीअल कॉरीडोर’ वाहतूक नियोजनासाठी पूर्णवेळ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करा