मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. सरकारने निर्णायक पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही संप मागे घेण्यात आलेला नाही. परिवहनमंत्री अनिल परब यांनी अनेकदा कर्मचारी संघटनांशी चर्चा करूनही संप फुटेनासा झाला आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
मागील एकही दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या कनिष्ठ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि अनिल परब यांच्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर संप माघारी घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. असं असतानाही अजूनही कर्मचारी कामावर न परतल्याने सर्वसामान्य जनतेचा खोळंबा झाला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बोलताना म्हटलं आहे की विलगीकरण हे शक्य नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवा; मुनगंटीवारांची मागणी
गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका, हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. मान्यता प्राप्त युनियन पवारांच्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयातून यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. अजित पवार यांना विलीनीकरण शक्य नाही, असे माहीत होते, तरी देखील राष्ट्रवादीने आपल्या जाहीर नाम्यात का उल्लेख केला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ठाकरे सरकारची माहिती
एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ५० वर्षांपासून तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. कर्मचारी तुमच्या पाठीमागे ढाल बनून राहिले आणि तुम्ही कर्मचाऱ्यांचा सरळ सरळ घात करून टाकला. राष्ट्रवादीवाले म्हणत होते आम्ही कर्मचार्यांना भडकवत आहोत. आम्ही विरोधाला विरोध करणारे नाहीत. आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे संसार उघड्यावर आले. हे सर्व सरकारचे अपयश आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही पडळकरांनी केली आहे.
Read also:
- महाराष्ट्रातील निवडणुकांवर ओमिक्रॉनचे सावट; विधासभेत चर्चा निवडणूका पुढं ढकलणार ?
- विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’; अजित पवार नेमके कुणावर भडकले?
- विधानसभेत शिवसेना आमदारानेच जाहीर केली मुख्यमंत्र्यांवरची नाराजी…
- ‘रेसिडेन्सिअल कॉरीडोर ते इंडस्ट्रीअल कॉरीडोर’ वाहतूक नियोजनासाठी पूर्णवेळ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करा
- धक्कादायक..! अधिवेशन सुरु असताना विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न