मुंबई – हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाखडी सुरू आहे, अशातच अजित पवारांनी एवढा स्फाट काय करतो विधानसभेत? विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’ असा रोखठोक सवाल विचारल्याने काही काळ वातावरण पुन्हा तापल्याचे पहायला मिळाले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सभागृहाची प्रश्नपत्रिका न मिळाल्याने सदस्य भडकले. यावेळी अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.
नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार
अजित पवारांना आपण अनेकदा बेधडक बोलताना बघितले आहे. अजित पवार भर सभेत विरोधकांना थेट आव्हान देणारे नेते म्हणून ओळखले जातात. इतकेच काय अजित पवार त्यांच्याच सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही अनेकदा शाळा घेतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे, याच अजित पवारांचे हे आक्रमक रुप आज पुन्हा सभागृहाने पाहिले आहे.
प्रत्येक दारामध्ये तुम्ही लोक उभे करता, त्यावेळी आत आमदार आल्यानंतर त्यांच्या हातात गठ्ठा द्या, काम होऊन जाईल असे म्हणत अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. सदस्यांच्या वेदना बरोबर आहेत, त्याचे काय चुकीचे आहे? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. तसेच पुढील कामकाजाबाबतही अजित पवारांनी काही बदल सुचवले, त्याला नरहरी झिरवळ यांनीही संमती दर्शवली आहे.
विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल
कोरोनामुळे सध्या विधानसभेच्या अधिवेशनाचा कालवधी कमी ठेवण्यात आला आहे. जेव्हापासून कोरोना आला आहे, तेव्हापासून प्रत्येक वेळी अधिवेशनचा कालावधी कमी करण्यात आला आहे. एक तर सात दिवसाचे अधिवेशन असते, मग एवढा स्टाफ झोपा काढतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला, त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मध्येस्थी करत अजित पवारांचे बरोबर असल्याचे सांगत सदस्यांच्या भावनांचा विचार करावा अशी विनंती केली. त्या सदस्याच्या मतदारसंघातीलच नव्हे तर प्रश्न कुठलाही असेल तर त्यात सहभागी होण्याचा अधिकार सर्वांना आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
Read also:
- विधानसभेत शिवसेना आमदारानेच जाहीर केली मुख्यमंत्र्यांवरची नाराजी…
- ‘रेसिडेन्सिअल कॉरीडोर ते इंडस्ट्रीअल कॉरीडोर’ वाहतूक नियोजनासाठी पूर्णवेळ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करा : महेश लांडगे
- धक्कादायक..! अधिवेशन सुरु असताना विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
- राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ठाकरे सरकारची माहिती
- “अजितदादा, तुम्ही शेजाऱ्यांचे अनुकरण करा!”; सुधीर मुनगंटीवार यांनी साधला निशाणा