पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपकडून महाराजांचा अवमान होईल असे कृत्य करण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे.
विधानसभेत शिवसेना आमदारानेच जाहीर केली मुख्यमंत्र्यांवरची नाराजी…
यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी संबित पात्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. एमआयएमआयचे नेते असुद्दिन ओवेसी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संबित पात्रा आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते की, मियाँ कुणाला धमकावत आहात तुम्ही ?
लक्षात ठेवा जेव्हा-जेव्हा या भूमीवर कूणी औरंगजेब किंवा बाबर येणार तेव्हा तेव्हा मातृभूमीसाठी कूणी शिवाजी, महाराणा प्रताप आणि मोदी-योगी उभे राहणार ! आम्ही न कधी मुघलांशी घाबरलो न कधी जिन्नावादियांशी मग तुम्हाला काय खाक घाबरणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.
विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’; अजित पवार नेमके कुणावर भडकले?
याला रुपाली ठोंबरे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ठोंबरेंनी म्हटलं आहे की भाजपचं संबंधित पात्र बरळलं, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप याची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा शिवद्रोह उघडा पडत आहे. कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटणाऱ्यांनो लोक समजून गेलेत “गंगाधर हि शक्तिमान है” असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपा "संबंधित पात्र" बरळल, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप याची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा #शिवद्रोह उघडा पडत आहे . कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटनारानो लोक समजून गेलेत "गंगाधर हि शक्तिमान है". pic.twitter.com/0TlpQPFAT4
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 24, 2021
Read also:
- “त्या पेनड्राईव्हचा सोर्स काय? देवेंद्र फडणवीसांनी हे सांगणं बंधनकारक”
- “गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं…”; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
- शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट..!
- फडणवीसांना समन्स बजावल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- वाघाला पाहून नितेश राणेंच्या तोंडातून म्याव- म्याव आलं असेल; किशोरी पेडणेकरांची खोचक टीका