नवी दिल्ली – काँग्रसेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पक्षाने मोठा धक्का दिला आहे. राऊत यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन गच्छती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश लिलौठिया यांना संधी देण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसने ट्वीट केले आहे. राऊत यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.
फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांचे समन्स
तसेच के. राजू. यांची SC/OBC/ अल्पसंख्याक विभाग आणि अखिल भारतीय आदिवासी विभागाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावरुन गच्छती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाने नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना समन्स बजावले होते.
त्यानंतर या नेत्यांनी दिल्ली वारीही केली होती. या बैठकीमध्ये नागपूर निवडणुकीच्या पराभवाची विचारना राऊत यांना करण्यात आल्यीच चर्चा होती. त्या बैठकीनंतर राऊत प्रसारमाध्यमांशी काही न बोलता निघून गेले होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची मंत्रीमंडळात वर्ण लागणार असल्याची चर्चा आहे.
सायबर पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
त्यातच पटोले यांना नितीन राऊत यांचे ऊर्जा खाते मिळणार असल्याचे सांगितले जात होत. त्यावरुन गेल्या अनेक दिवसापासून नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात पक्षांतर्गत वाद असल्याचे सांगितले जात आहे.
Read also:
- “खडसे कुटुंबाकडून माझ्या जीवाला धोका”; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
- “आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होणार!”
- ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात नवी नियमावली लागू, असे असतील नवे निर्बंध..!
- “पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?”
- मोठी बातमी..! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…