कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मागील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूरचं बदला घेणारं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला प्रचित आहे. मागील काही दिवसांमध्ये कोल्हापुरात महाविकास आघाडीने गोकुळ, विधानपरिषद अशा सर्वच निवडणुकांमध्ये आपला विजयी झेंडा डौलाने फडकवला होता.
“नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
जिल्हा बँकेला मात्र सगळ्यांनीच वेगळी मोट बांधली आहे. पालकमंत्री बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने यांनी मिळून आपली वेगळी आघाडी केली आहे तर दुसऱ्या बाजूला खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी वेगळी मोट बांधली आहे. खासदार संजय मंडलिक यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हसन मुश्रीफ आणि बंटी पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणुकांत, वेगवेगळ्या लोकांची साथ घ्यायची आणि सर्व संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या हीच भूमिका काही नेत्यांची आहे.
“नितेश राणेंना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजाश्रय?”; संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय
भारतात सध्या असं म्हणतात की अदानी-अंबानी राज्य करत आहेत असे म्हणतात. असेच अदानी, अंबानी हे कोल्हापूर जिल्ह्यातही आहेत. त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ आणि बंटी पाटलांचे नाव न घेता केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या ठरावदार मतदारांचा मेळावा कळंबा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
Read also:
- “सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ”; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी: नितेश राणे यांना धक्का, अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
- कोरोना रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट, राज्यासाठी धोक्याची घंटा – राजेश टोपे
- देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले
- कणकवलीत जिल्हा बँकेचे मतदान पार पडल्यानंतर सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा