नाशिक – गुन्हेगारांना इतर राज्यांत राश्राजय देण्याचे प्रकार घडतात. राजकीय पक्षांकडून असे प्रकार घडतात. जर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच एखाद्या गुन्हेगाराला राजाश्रय दिला असेल तर पोलिसांनी ते शोधण्यात अडचणी येतात, अशा शब्दात प्रत्यक्ष नाव न घेता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फरार नितेश राणे यांच्याविषयी प्रश्नाला उत्तर दिले.
ते म्हणाले, हत्येच्या प्रयत्नातील पोलिसांना हवा असणारा संशयित आरोपी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माहिती आहे; पण सांगणार नाही, असे ते पत्रकार परिषदेत म्हटले. त्याचे विधान हे कायद्याचे उल्लंघन आहे, कायद्याला, पोलिसांना सहकार्य करणं हे कर्तव्य आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फरारी असलेल्या गुन्हेगारांची माहिती असूनही ते लपवत असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, गुन्हेगार कुठे लपले असले तरी राज्याचे पोलिस त्यांना शोधून काढतील.
नितेश राणेंना दुहेरी धक्का, आधी पोलिसांचा आणि आता सहकार विभागाचा दणका
राऊत म्हणाले, की दुसऱ्या राज्यात लपवून ठेवले असेल, तर गुन्हेगार पोलिसांना कसे सापडतील. अनेकदा गुन्हेगारांना राजाश्रय मिळतात, तेव्हा गुन्हेगार शोधायला पोलिसांना वेळ लागतो. कोणताही गुन्हेगार राज्यातील पोलिस शोधून काढतील. राणे प्रकरणात राजाश्रय मिळतो आहे काय, याविषयी मात्र त्यांनी थेट राणे यांचे नाव घेण्याचे टाळले.
Read also:
- पवारांच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला.. ते वाक्य कोणतं?
- इतर वेळी खाडकन बोलणारे अजित पवार पहाटेच्या शपथविधीविषयी काहीच का बोलत नाहीत?
- “तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा, विश्वास कोण ठेवणार”; चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला
- “नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
- “संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेच”; विनायक राऊतांचा आरोप