सिंधुदुर्ग – कणकवलीमध्ये शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या घडामोडी पाहता येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जो हल्ला झाला त्यामागे नितेश राणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी जे आरोपी पकडले त्यांनी राणे यांच्याशी संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचे राऊत म्हणाले.
भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात आमदार नितेश राणे देखील सहभागी असल्याचा आरोप शिवसनेच्या गोटातून सातत्याने करण्यात येत आहे. याप्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांनी चौकशीही केली. राणे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात शिवसैनिक संतोष परब हे जबर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागतासाठी सरकारची नवीन नियमावली; काय आहेत निर्बंध वाचा सविस्तर…
नितेश राणे यांचा कार्यकर्ता गोट्या सावंत आणि आणखी एका आरोपीस या संदर्भात अटक करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्या जामिनावर अत्यंत महत्वाची सुनावणी काल होत असताना ते या सुनावणीलाही गैरहजर राहिले आहे. सरकारी वकील यांनी युक्तिवाद करत असताना म्हटलं आहे की आरोपींच्या बाजूने पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर नितेश राणेंना अटक केली तर मोर्चा काढू अशी वक्तव्य केली जात आहेत. नितेश राणेंच्या पीएने म्हणजेच राकेश परबने या प्रकरणातील आरोपी सचिन सातपुतेला ३३ वेळा फोन केले आहेत.
Read also:
- राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस
- “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती”
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला