मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर पूर्ण सरकार स्थापन केलं असतं. असं अर्धवट काम केलं नसतं, असं भाष्य केलं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती. आम्ही काहीही लपवत नव्हतो असं राऊत यांनी म्हटलं आहे.
विद्यापीठ कायद्याबद्दल विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंताचे प्रत्यूत्तर
“शरद पवार सांगत आहेत, त्यामुळे ते सत्य असावं. भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होती. त्यामुळे यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला. अजित पवार यांना गाठा, असे उपक्रम त्यांचे सुरु होते. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती, हे मला माहिती होते. तेही आमच्याशी बोलले होते. त्या काळात आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण कोणाशी बोलतो आहे. कोण कोणाला भेटायला जात आहे, त्या काळात आमच्यात अत्यंत पारदर्शकता होती. हे भाजपला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घ्यायला गेले तेव्हादेखील आमच्यात पारदर्शकता होती,” असे संजय राऊत म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
तसेच पुढे बोलताना, राजकारणात पारदर्शकता असायला हवी. राज्यात एवढी मोठी घडामोड घडत होती. राज्यात सत्तापरिवर्तन होत होते. कोणता दगड आड येऊ नये तो कसे काढता येईल हे आम्ही करत राहिलो. आमच्याकडे तेव्हादेखील जेसीबी होती. आमच्यात पारदर्शकता होती त्यामुळे संध्याकाळपर्यंत सर्व आमदार परत आले. अजितदादादेखील तेव्हा परत आले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
Read also:
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
- १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी