सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसत असल्याचं वक्तव्य विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नारायण राणेंना CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले आहेत की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.
खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी असल्याचही फडणवीस म्हणाले आहेत. आणि जर त्या पोलिसांवरती गुन्हा नोंदवला नाही तर भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
…. आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल !
(3/3)#NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2021
दरम्यान, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे प्रकरणात पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तेव्हा फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात ठिकठिकाणी चोऱ्या, बलात्कार, घोटाळ्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांना या प्रकरणांमधील आरोपींना पकडण्यासाठी वेळ नाही मात्र नितेश राणेंच्या अटकेसाठी राज्याचे १२ मुख्य अधिकारी सिंधुदुर्गात तळ ठोकून बसले आहेत. आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये दंडेलशाही आम्ही खपवून घेणार नाही अशी रोकठोक भूमिका फडणवीसांनी मंडळी आहे. अजूनही नितेश राणे हे फरार आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतर त्यांना अटक होते की जामीन मिळतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
Read also:
- “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती”
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर