सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीमुळे सिंधुदुर्गात राजकीय धुमशान पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसैनिकाला झालेल्या मारहाण प्रकरणात नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांनी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यापूर्वी नितेश राणे आणि भाजपला एक मोठा झटका बसला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान
आमदार नितेश राणे ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्जरुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे सहकार विभागाने आमदार नितेश राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. आमदार नितेश राणेंचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याने राणेंना आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान
या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांचे नाव संतोष परब मारहाण प्रकरणात आल्यामुळे मनीष दळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र निकाल प्रलंबित असल्याने आज प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मनीष दळवी आपला मतदानाचा हक्क आहे तो कसा बजावतात हे महत्वाचे ठरणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 4 पर्यंत 39 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात नेमका जिल्हा बँकेवर कोण बाजी मारत हे चित्र स्पष्ट होणार आहे.
Read also:
- “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती”; पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर