मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना कोणत्या घडामोडी घडल्या याबाबत एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली. तसेच या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी विचारलं होतं, असं देखील पवार यांनी सांगितलं.
नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
शरद पवार यांच्या या वक्तव्यांवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांना चांगलेच टोले लगावले आहेत. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
“मोदी यांनी आपण एकत्र सरकार स्थापन करु असं सांगितलं होतं असे भाष्य शरद पवार यांनीक केले. तसेच अजित पवार यांनी शपथ का घेतली ? शरद पवार यांनी त्यांना पाठवले होतो का ? हे मला समजणार नाही. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण मी शरद पवार यांना एकच प्रश्न विचारेन की हे सांगायला तुम्हाला इतके महिने का लागले. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार. मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का ? हा मोठा प्रश्न आहे,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
Read also:
- “नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
- “संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेच”; विनायक राऊतांचा आरोप
- राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस
- “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती”
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…