जळगांव : राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील संवादाला सुरुवात झाली आहे. 20 वर्षात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील हे खडसेंच्या मुंबईतील घरी गेले. यावेळी दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या भेटीनंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवादही साधला. खडसेंना शह देण्याची या मागची कोणतीही खेळी नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं.
जोर का झटका : नारायण राणे यांना बसला विजेचा शॉक, सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. याशिवाय सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. स्वतः गुलाबराव पाटील हे सुध्दा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जळगाव जिल्हा बँकेवर सध्या एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. पाटील यांनी नुकतीच खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 20 वर्षात प्रथमच आपण खडसेंच्या मुंबईच्या घरी गेलो, असं पाटील यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलं.
ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
मात्र दुसरीकडे खडसे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या बाबत पत्रकारांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता, खडसेंना शह देण्याची कोणतीही खेळी नाही, जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. यासाठीच आपण गेल्या 20 वर्षात प्रथमच एकनाथराव खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गेलो होतो, असं ते म्हणाले.
Read Also :
- जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार
- दरोडेखोर परमवीर सिंग यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे; हसन मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
- सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाला मनःशांती लाभो आणि राज्याला बदनाम न करण्याची सद्बुद्धी मिळो – रोहित पवार
- अजित पवार पुर्णपणे अज्ञानी आहेत, फक्त स्वत: वरील गुन्हे हटवण्यापुर्ते हुशार होतात – नारायण राणे
- १०० कोटी वसुलीत अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचा सीबीआयचा अहवाल, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर?