मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी राऊत यांना समन्स बजावला आहे. मात्र संजय राऊत सध्या दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशनासाठी गेलेले आहेत. यामुळे राऊत यांचे वकील वेळ मागून घेणार असल्याचं समजतं आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत तो भगवान है, उनका नाम मत लिजिए! उदयनराजे संतापले
सोमय्यांनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना चैकशीला तर काही मंत्री जेलमध्ये ही जावे लागले आहे. यातच आता संजय राऊतांची पाळी आहे. असं सुचक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर काय चौकशी होणार याकडे लक्ष असणार आहे. आज मुंबई ईडी कार्यालयात संजय राऊत यांना हजर राहण्याचं नोटीस देण्यात आली आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना हे समन्स आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे अनिल परब आणि आता संजय राऊत यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवब मलिक हे सध्या शिक्षा भोगत आहेत. यामुळे राऊतांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष असणार आहे.
“अजित पवारांनी महाराष्ट्राचा खजिना राष्ट्रवादीसाठी लुटला”; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
याआधी संजय राऊत म्हणाले होते की, मी आज ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार नाही. एक राजकीय घडामोडीचा भाग हे सगळं सुरु आहे. तरी सुद्धा मी ईडीच्या चौकशीला हजर राहणार आहे. एखादा पक्ष आपल्या आनंदासाठी फोडला आहे. आमचं लक्ष आहे. आज सुनावणी सुरु होईल. आमच्या सर्वोच्च न्यायालात आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने मी ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यांना जी काही लढाई लढायची आहे. ती त्यांना लढू द्या.. ते आमचे सहकारी होते.
“अनेक जण सेनेला सोडून जात असताना राष्ट्रवादी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी”
आजही सहकारी होते. प्रत्येकाचं वेगळं कारण आहे. प्रत्येक कारण त्यांना माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान ऐकलं आहे. त्यामुळे दानवे यांनी याबाबतची एक क्लीप मी पाठवतो. ते इथे माझ्या शेजारी राहायला आहेत. २०१४ ते २०१९ मध्ये झालेल्या घटनेला कोण जबाबदार कोण आहेत. रावसाहेब दानवे हे पुढच्या टर्ममध्ये….बंड केलेल्या नेत्यांची मजबूरी मला माहित आहे. त्यामुळे मी त्यांच्याबाबत कोणतही वक्तव्य करीत आहे. असली आणि नकलीचा प्रश्न इथे येत नाही. काही दिवसांनी असे म्हणतील की, बाळासाहेबांना आम्हीचं शिवसेना प्रमुख केलं. या देशातील लोकतंत्र अजून मेलेलं नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे त्याबाबत काहीही आत्ता बोलणं योग्य ठरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
“आपण पडलो तरी बेहत्तर, पण..;”ठाकरेंसोबतच्या भेटींचा आढळरावांनी सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, संजय राऊतांनी, संसार में सबसे आसान काम अपनेको धोका देना है.. असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. याआधी राष्ट्रवादीचे अनिल देसमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे अनिल परब आणि आता संजय राऊत यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवब मलिक हे संध्या शिक्षा भोगत आहेत. यामुळे राऊतांच्या वर काय कारवाई होणार याकडे लक्ष असणार आहे.
Read also
- शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या..! शिंदे गटाकडून निवडणुक आयोगाला पत्र
- मुळ शिवसेना एकनाथ शिंदें की उद्धव ठाकरेंची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- “रिक्षावाला, पानपट्टी, वेश्या यांच्यासाठी शिंदे सरकार योजना राबवणार” उदय सामंत
- शिंदे गटातील खासदाराला केंद्रात मंत्रिपद? राज्यात बलात्काराचा गुन्हा, शिंदे म्हणाले..;
- “माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, परंतु धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा”