मुंबई : पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या अनेक नेत्यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. यामध्ये रामदास कदम यांची देखील नेतेपदावरून हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार आणि अजित पवार यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहे. तसेच मेल्यानंतरही मी भगव्यातच जाणार असून बेईमानी माझ्या रक्तात नाही, त्यासाठी आम्ही शिवसेना वाचवत असल्याचे रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना सांगितले आहे.
पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये; संजय जाधवांचं बंडखोरांना आवाहन
एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 10 आमदारही निवडून आले नसते. अजित पवारांनी तर महाराष्ट्राचा खजिना राष्ट्रवादीसाठी लुटला. पक्ष फुटतोय, तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? ज्या पवारांचा शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर विरोध केला. ते शरद पवार तुम्हाला का हवेत? कुणासाठी हवेत? आमची कसली हकालपट्टी करत आहात? तुमच्या बाजूला बसलेल्या पक्षद्रोहीच्या मुळावर घाव घातला पाहिजे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
“शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
माझ्या मुलाच्या मतदारसंघात १० कोटींचा निधी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कसा दिला, त्याची यादीच देतो आता मी, ही अवस्था शिवसेनेच्या सर्व आमदारांची आहे. अजित पवारांनी एक कलमी कार्यक्रम सुरू केला होता. ते सकाळी ७ वाजता मंत्रालयात जात होते. या माणसानं डाव साधला. जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत. तिथे त्यांच्या पडलेल्या आमदाराला निधी देण्याचं काम त्यांनी सुर केलं. त्यांचं १०० चं टार्गेट होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवला आणि अजित पवारांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्यामुळे त्यांनी तो डाव साधला असा आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे.
“शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम
दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली, मातोश्रीसोबत दगाफटका केला, ठाकरे यांचा विश्वासघात केला, आणि स्वतःची कृती योग्य आहे हे दाखवण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न बंडखोर करत आहेत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटलांनी देखील निशाणा साधला आहे.
Read also
- “अनेक जण सेनेला सोडून जात असताना राष्ट्रवादी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी”
- “आपण पडलो तरी बेहत्तर, पण..;”ठाकरेंसोबतच्या भेटींचा आढळरावांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- “मग उद्धव ठाकरेंचा हा जुळा भाऊ आहे का”? जुना फोटो ट्विट करत राणेंचा राऊतांना सवाल
- बाबांनो तुमचे काम, वाद तुम्हीच करा, कशाला तुमचे खापर पवार साहेबांवर फोडता?
- भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणुक; पुणे पोलिसांकडुन तक्रार दाखल