पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. यामुळे शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसत आहेत. काल शिंदे गटातील आमदारांच्या बैठकाला शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटलांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तसेच 15 दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीशी असलेली आघाडी तोडून कसं चालेलं असं उद्धव ठाकरेंनीच सांगितले असल्याचे आढळराव पाटलांनी सांगितलं.
“शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम
आपले सगळे आमदार राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला कंटाळून शिवसेनेला सोडून गेलेत. जाऊ द्यात, झालं गेलं विसरून जाऊ. पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरू. आपण पडलो तरी बेहत्तर पुन्हा कधी निवडून येऊ..पण आपण आपली ताकद आजमावू. फक्त राष्ट्रवादीशी असलेली आघाडी तोडा, असं शरद सोनावणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावर आपल्याला पवारांना सोडुन चालणार नाही. शरद हे शक्य होणार नाही, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. असं आढळराव पाटील म्हणाले.
“बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”
त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हाकालपट्टी झाल्याची बातमी सामनातुन मला समजली. त्यानंतर हे सर्व प्रकरण चुकीच्या पद्धतीने झाल्याचं मला उद्धव ठाकरे, विनायक राऊत, अरविंद सावंत यांनी मला फोन करून सांगितले. त्यानंतर मी आणि शरद सोनवणे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. त्यावेळी राजकीय परिस्थितीवर आमच्यामध्ये सखोल चर्चा देखील झाली. यापासून पुढची पावलं काय असावीत, आता काय नियोजन असलं पाहिजे, काय केलं पाहिजे, यावर जवळपास दोन तास चर्चा झाली असल्याचंही आढळराव पाटलांनी सांगितले.
“मुखर्जी, वाजपेयींबद्दल बोलता अन् दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप करता”
चर्चेच्या शेवटला शरद सोनवणे उद्धव ठाकरेंना म्हणाले, आपण स्वबळावर 288 जागा लढू. आम्ही पडलो तरी बेहत्तर पुन्हा कधी निवडून येऊ पण फक्त राष्ट्रवादीशी असलेली आघाडी तोडा असे शरद सोनावणे म्हणाले. यानंतर उदव ठाकरे पवार यांना सोडुन आपल्याला चालायच नाही असं म्हणाले असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.
Read also
- “मग उद्धव ठाकरेंचा हा जुळा भाऊ आहे का”? जुना फोटो ट्विट करत राणेंचा राऊतांना सवाल
- बाबांनो तुमचे काम, वाद तुम्हीच करा, कशाला तुमचे खापर पवार साहेबांवर फोडता?
- भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणुक; पुणे पोलिसांकडुन तक्रार दाखल
- पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये; संजय जाधवांचं बंडखोरांना आवाहन
- “शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर