पुणे : भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर आणि देवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणूक एका अज्ञात व्यक्तीने केलीची माहिती माधुरी मिसाळ यांनीच दिली आहे. या प्रकरणात पुण्यातील बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.
आधी रड रड रडले, नंतर दिला थेट इशारा; “आमच्यामुळे खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये”
मुकेश राठोड या तरुणाने आई आजारी आसल्याच कारण देत भाजपच्या चार आमदारांची आर्थिक फसवणुक केली आहे. मराठवाड्यात राहणाऱ्या मुकेशने महिला आमदारांना आई आजारी असल्याचं सांगत मदत मागितली होती. आमदारांनीही मदत म्हणुन काही रक्कम ऑनलाईन माध्यमातुन मुकेशला पाठवली असल्याचं सांगितलं आहे. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचं त्यांना समजताच बिबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
“पुर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत”
मुकेश हा सध्या फरार आहे, पोलीस त्याचा तपास घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डकर आणि दिवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणुक केल्याप्रकरणी मुकेश राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी बिबेवाडी पोलिसांना पत्र लिहून कळवलं आहे.
“आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो”; शिंदे गटात उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया
मुकेशने मला फोन करत माझी आई बाणेर, पुणे येथे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल आहे. मला औषध घेण्यासाठी काही पैसे तुम्ही गुगल पेवर पाठवावे आणि त्याने मला 9096350321 या नंबर वर 3400 रक्कम पाठवण्यास सांगितले. मी माझ्या मुलीला सांगुन या नंबरवर पैसे पाठवले. त्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे, श्वेता महाले यांनाही संबंधित व्यक्तीने फोन करून हेच सांगितले. त्यांच्याकडुन ही पैसे मागितल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी पोलिसांनी दिली आहे.
Read also
- पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये; संजय जाधवांचं बंडखोरांना आवाहन
- “शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
- “शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम
- “बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”
- “मुखर्जी, वाजपेयींबद्दल बोलता अन् दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप करता”