मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. शिंदे यांचं हायकमांड दिल्लीत असून ते सध्या भाजपचे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी त्यांची भेट घेतली अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसोबतचा फोटो शेअर करत राऊतांवर निशाणा साधला आहे.
“बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची 2020 साली भेट घेतली होती. तोच फोटो नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. त्यात त्यांनी संजय राऊतांना गजनी असा उल्लेख करत खाली कॅप्शन देखील लिहिलं आहे. त्यात त्यांनी मग हा फोटोमध्ये कोण आहे? जुडवा? असं म्हणत त्यांनी राऊतांना सवाल केला आहे. गजनी चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे प्रमुख अभिनेता गोष्टी विसरतो तसेच संजय राऊत देखील विसरत आहेत, असंही नितेश राणेंना या फोटोमधून सांगण्यात येत आहे.
“मुखर्जी, वाजपेयींबद्दल बोलता अन् दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप करता”
एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांनी देखील भेट घेतली आहे. यामध्ये भावना गवळी, हेमंत गोडसे, धैर्यशील राव माने यांचा समावेश आहे. त्यामुळे आता आमदारांसोबतच आता खासदार देखील शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काल एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी देखील जाहीर केली आहे. यामध्ये बंडखोर आमदारांना महत्वाचे पद सोपवण्यात आले आहे.
आधी रड रड रडले, नंतर दिला थेट इशारा; “आमच्यामुळे खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये”
दरम्यान, शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर लागलेली गळती थांबण्याचं काही चित्र दिसत नाही. यातच आज बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. बाळासाहेबांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळालं, असं स्पष्ट करत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलं आहे.
According to Ghajani Raut .. Sena CM has never come to delhi to meet high command..
So who is this in the pic ?
Judwaa? pic.twitter.com/JnliM1hA0j— nitesh rane (@NiteshNRane) July 18, 2022
Read also
- बाबांनो तुमचे काम, वाद तुम्हीच करा, कशाला तुमचे खापर पवार साहेबांवर फोडता?
- भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणुक; पुणे पोलिसांकडुन तक्रार दाखल
- पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये; संजय जाधवांचं बंडखोरांना आवाहन
- “शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
- “शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम