पुणे : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली, मातोश्रीसोबत दगाफटका केला, ठाकरे यांचा विश्वासघात केला, आणि स्वतःची कृती योग्य आहे हे दाखवण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न बंडखोर करत आहेत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटलांनी देखील निशाणा साधला आहे.
“शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
२०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांची मोट ही आदरणीय पवार साहेबांनी बांधली, याची माहिती संपूर्ण देशाला आहे. यात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना त्यांनी उत्तम कारभार केला, देशातील पाच उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचे नाव घेतले गेले. आता अनेकजण शिवसेनेला सोडून जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खंबीरपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेसोबत आहे, असे महेश तपासे यांनी सांगितले.
“शिवसेना आज पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही”; रामदास कदम
रुपाली पाटील यांनी आपल्या ट्विटवर लिहिलं आहे की, शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की शरद पवार यांना मध्ये आणतात. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वत:च्या हिंमतीवर करा, कशाला तुमचे खापर शरद पवार साहेबांवर फोडता ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच सरतेशेवटी त्या म्हणाल्या की, सत्तापिपासुमुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”
शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. पक्षाविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेतुन रामदास कदम आणि आनंदराव अडसुळ यांची पक्षातुन हाकालपट्टी केली आहे. कालपर्यत उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले पुणे जिल्हयातील मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यानी ही शिंदे गटाची वाट धरली आहे. शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील ही शिवसेनेतुन बाहेर पडले आहेत.
Read also
- “आपण पडलो तरी बेहत्तर, पण..;”ठाकरेंसोबतच्या भेटींचा आढळरावांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- “मग उद्धव ठाकरेंचा हा जुळा भाऊ आहे का”? जुना फोटो ट्विट करत राणेंचा राऊतांना सवाल
- बाबांनो तुमचे काम, वाद तुम्हीच करा, कशाला तुमचे खापर पवार साहेबांवर फोडता?
- भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणुक; पुणे पोलिसांकडुन तक्रार दाखल
- पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये; संजय जाधवांचं बंडखोरांना आवाहन