दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीमध्ये शिवसेनेच्या 12 खासदारांची भेट घेतली. त्यानंतर आता आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे 12 खासदाराही शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना राज्यातील राजकीय घडामोडीवर विचारले असता त्यांनी संजय राऊत तो भगवान है असं म्हणत त्यांच्याबाबत बोलण्याचं टाळलं.
भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणुक; पुणे पोलिसांकडुन तक्रार दाखल
उदयनराजे म्हणाले की, राज्यातील विकास कामांना चालना मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना खासदारांच्या फुटीसंदर्भात तसेच संजय राऊत यांच्या संबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत तो भगवान है, उनका नाम मत लिजिए! मुझे उनके बारे में कुछ कहकर मुह खराब नही करना है. त्यानंतर त्यांनी संजय राऊतांवर बोलण्याचं टाळलं.
पक्षाच्या वटवृक्षावर घाव घालण्याचं पाप आपण करू नये; संजय जाधवांचं बंडखोरांना आवाहन
तसं पाहिलं तर या आगोदर राज्यात मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जात होता. या अगोदर चेहरे बघुन कामे केली जायची. माझी एकही फाईल आजपर्यत क्लेअर झालेली नाही, असा खुलासाही त्यांनी केला. याचबरोबर आज जे काय आपण पाहतोय, तेही याच कारणामुळे झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे काही नेते आहेत. त्यांचीही तीच व्यथा होती बाकी काही नाही. निवडुन आल्यानंतर मतदारसंघातील लोकांची कामे झाली पाहिजेत, जर कामे होत नसतील, तर अशा पदावर राहुन काय उपयोग आहे. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच निवडून आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच राजीनामा द्यायला मी काय मुर्ख होतो का? असं देखील उदयनराजे यांनी म्हणत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
“शिंदे-ठाकरे वादात भाजपची चांदी”; शिंदे गटातील 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे या खासदारांनी आज मुख्यमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाणार असुन याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले असल्याची माहीती समोर येत आहे.
Read also
- “अजित पवारांनी महाराष्ट्राचा खजिना राष्ट्रवादीसाठी लुटला”; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
- “अनेक जण सेनेला सोडून जात असताना राष्ट्रवादी खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी”
- “आपण पडलो तरी बेहत्तर, पण..;”ठाकरेंसोबतच्या भेटींचा आढळरावांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- “मग उद्धव ठाकरेंचा हा जुळा भाऊ आहे का”? जुना फोटो ट्विट करत राणेंचा राऊतांना सवाल
- बाबांनो तुमचे काम, वाद तुम्हीच करा, कशाला तुमचे खापर पवार साहेबांवर फोडता?