मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गट २३ जागा लढविणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काॅंग्रेसच्या वाट्याला १५ ते १७ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गट १० ते ११ जागांवर आग्रही आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून दहा ते ११ जागांसह अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काॅंग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा असल्याचीही माहिती समोर आली आहे. याजागांसाठी शरद पवार दिल्लीत चर्चा करणार आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?
पुढील लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट १० ते ११ जागांसाठी आग्रही आहे. यामध्ये बारामतीसह शिरूर, बीड, दिंडोरी, अहमदनगर, भिवंडी, जळगाव, रावेर, माढा आणि सातारा तर वंचितच्या वाटेला अकोला जाण्याची शक्यता आहे. तर राजू शेट्टींना हातगणंकले जाऊ शकते. मुंबईमध्ये ठाकरे गटाला चार जागा येण्याचा अंदाज आहे. यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई तर काॅंग्रेस याठिकाणी उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईची जागा लढवू शकते.
हेही वाचा…एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंच्या भेटीवर आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, मार्चमध्ये हनिमुनला जातील अन् त्यानंतर…
दरम्यान, काल झालेल्या दिल्लीच्या बैठकीत काॅंग्रेसने देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती समोर आली आहे. काॅंग्रसेच्या फॉर्म्युल्यानुसार काॅंग्रेस २२, शिवसेना १८ तर राष्ट्रवादी ६ जागांवर निवडणूक लढेल. तर वंचितलाही २ जागा दिल्या जातील. काॅंग्रेस या फॉर्म्युल्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करणार आहे. शिवाय मुंबईतल्या तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही असल्याचीही माहिती मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“शीतल म्हात्रे तुझं चिचुंद्रीसारखं तोंड बंद ठेव नाहीतर..”, शीतल म्हात्रेंना सुप्रिया सुळेंवरील टीका भोवली
हेही वाचाराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांच्या ८० गाड्या नेमक्या कशासाठी? अजित पवार गटाने दिलं ‘हे’ उत्तर
हेही वाचा…“फक्त पक्ष अन् लोकांची घरं फोडण्याचं काम भाजपने केलंय, “सुप्रिया सुळेंचा भाजपवर आक्रोश
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?