पुणे : इंडिया टुडेने जाहीर केलेल्या शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. देशभरातील शंबर कर्तृत्ववान महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आली, त्यातच राजकीय सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय आणि अन्य पातळ्यांवर कार्यरत असलेल्या देशभरातील महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यातच राजकीय क्षेत्रात काम करत असताना सुप्रिया सुळे यांनी संसदेतून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी खोचक टिप्पणी केली आहे. त्यावर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार केलाय.
हेही वाचा..“खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत,”महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर, खडसे-महाजन वाद पेटला
इंडिया टुडेने जाहीर केलेल्या शंभर कर्तृत्वावान महिलांच्या यादीत सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर यावरून आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. १० एकरात ११० कोटींची वांगी. हा तर चक्क कृषीक्षेत्रात वैज्ञानिक शोध, वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना लवकरच दिला पाहिजे. असंही शील म्हात्रे यांनी म्हटलं आहे. त्यावर रोहिणी खडसे यांनी देखील शीतल म्हात्रे यांचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा…“मिटकरी.. “आमदार” लिहिताना लाज वाटेल असं वागू नका,” सुळे आणि कोल्हेंवर केलेली टिका मिटकरींना भोवली
महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले शीतल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिली आहे. आदरणीय सुप्रिया ताई बद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही. परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते. शीतल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे यांच्या वर टिका करायची. तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार होऊन दाखवा आधी. असं आव्हान देखील रोहिणी खडसे यांनी शीतल म्हात्रे यांना दिले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा , RTI टाका माहिती घ्या. नंतर आपले पिसाळे तोंड उघडा. चौकशी लागेलं म्हणून स्व पक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रे बाईने सुप्रियाताई सुळे यांच्यावर बोलणे म्हणजे शिंदळ बाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासारखे आहे. शीतल म्हात्रे आपलं चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. आदरणीय सुप्रिया ताई वर टिका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल..! चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकी नुसार वागा..! असा टोलाही त्यांनी म्हात्रेंना लगावला.
१० एकरात ११० कोटींची वांगी… 😅
.
हा तर चक्क कृषीक्षेत्रातला वैज्ञानिक शोध…
वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना लवकरच दिला पाहिजे… @Shivsenaofc @ShivSenaSampark #SupriyaSule pic.twitter.com/Kzcf7iMbhB— sheetal mhatre (@sheetalmhatre1) December 29, 2023
महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले @sheetalmhatre1 यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिली आहे. आदरणीय सुप्रिया ताई बद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते. शितल म्हात्रे तुमची…
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) December 29, 2023
READ ALSO :
हेही वाचाराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांच्या ८० गाड्या नेमक्या कशासाठी? अजित पवार गटाने दिलं ‘हे’ उत्तर
हेही वाचा…“फक्त पक्ष अन् लोकांची घरं फोडण्याचं काम भाजपने केलंय, “सुप्रिया सुळेंचा भाजपवर आक्रोश
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?
हेही वाचा.एकनाथ शिंदे अन् राज ठाकरेंच्या भेटीवर आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, मार्चमध्ये हनिमुनला जातील अन् त्यानंतर…