IMPIMP
Khadse's head has been affected, there will be no money to wear chappal Girish Mahajan's strong reply, Khadse-Mahajan controversy flared up Khadse's head has been affected, there will be no money to wear chappal Girish Mahajan's strong reply, Khadse-Mahajan controversy flared up

“खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, चप्पल घालायला पैसे राहणार नाहीत,”महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर, खडसे-महाजन वाद पेटला,

नाशिक : राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा बघायला मिळत आहेत.  अयोध्येतील राम मंदिरासाठी दोन्ही वेळेस कारसेवक म्हणून मी सहभागी होती. परंतु गिरीश महाजन कुठल्या जेलमध्ये होते? हे माहिती नाही, अशी खोचक प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलीय. तर एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झालााय. त्यांना चप्पल घ्यायाला पैसे राहणार नाही असा पलटवार महाजन यांनी खडसे यांच्यावर केलाय.

हेही वाचा…“ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही”, ठाकरेंचा हल्लाबोल, शिंदे अन् भाजपमधील नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश

राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारीला अयोध्येत पार पडणार आहे. याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यावरून खडसेंनी महाजनांना डिवचलं. अयोध्येतील राम मंदिरासाठी दोन्ही वेळेस कारसेवक म्हणून मी सहभागी होतो. त्या आंदोलनात ललितपुर जेलमध्ये मी होतो. परंतु गिरीश महाजन हे आमच्यासोबत होते हे मला आठवत नाही. ते कोणत्या जेलमध्ये होते ते माहिती नाही. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी मागितल्या १२ जागा ; सुप्रिया सुळे म्हणाल्या… 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या टिकेला गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ खडसे यांना सर्वत्र मी दिसतो. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर मला इलाज करावा लागणार आहे. आता त्यांना चप्पल घालायला पैसे राहणार नाही. कारण गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना १३७ कोटी रूपये भरावे लागणार आहे. तसेच २७ कोटी दंड भोसरी प्रकरणात भरावा लागणार आहे.  यामुळे त्यांची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे ते फालतू प्रश्न विचारात राहतात. कारसेवा आंदोलनात ते वेगळ्या जेलमध्ये होते. मी तत्कालीन खासदार गुणवंतराव सरोदे, वाय. जी. महाजन वेगळ्या कारागृहात होते. तेव्हाचे आमचे फोटो देशभर गाजले होते. असा पलटवार गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर केलाय.

READ ALSO :

हेही वाचा…“मिटकरी.. “आमदार” लिहिताना लाज वाटेल असं वागू नका,” सुळे आणि कोल्हेंवर केलेली टिका मिटकरींना भोवली 

हेही वाचा…सुप्रिया सुळेंनी बारामतीत ठोकला तळ ; दहा महिने बारामतीतच राहणार, निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात 

हेही वा“जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार, याची शाश्वती नाही” 

हेही वाचा..पदाधिकाऱ्यांना ८० गाड्या घेण्यासाठी अजित पवारांकडे १५ कोटी रूपये आले कुठून ? अंजली दमानियांचा सवाल 

हेही वाचा..“एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे ‘या’ महिन्यात एकत्र येणार”, शिंदे गटाच्या आमदाराने आतली बातमी फोडली