पुणे : अजित पवारांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी आगामी निवडणुकीचा चांगलाच धसका घेतला आहे. यातच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुळे आणि कोल्हे यांना डिवचलं आहे. त्यावरून आता शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मिटकरींना चांगलाच टोलवला आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी मागितल्या १२ जागा ; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
बारामतीसह शिरूर मतदारसंघात देखील आपण उमेदवार देणार आणि निवडून आणणार असं जाहीर वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. यातच कालचं दहा महिने आता मतदारसंघातच राहणार आणि प्रचार करणार असं सुप्रिया सुळे यांनी पौंड येथील सभेत केलं आहे. त्यावरून अमोल मिटकरी यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“राऊतांची तुलना महाभारतातील मंथरेशी ;” भाजपच्या महिला नेत्याने राऊतांना खडसावलं
दरम्यान, बारामती आणि शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार आदरणीय सुप्रियाताई व आदरणीय अमोल कोल्हे साहेब गुडघ्याला बाशिंग बांधुन मैदानात उतरले आहेत. राज्यभर फिरणाऱ्या या दोन्ही मोठ्या नेत्यांना मतदार संघात अडकुन राहावे लागणे यातच अजितदादांचे महत्व अधोरेखित होते. असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. त्यावर मिटकरी, ज्यांना मतदारसंघ असतो ते मतदारसंघातील प्रश्न सोडवतात. ज्यांना मतदारसंघ नसतो ते तुमच्यासारखे रिकाम्या गावगप्पा करतात. स्वतःच्या नावापुढे “आमदार” लिहिताना लाज वाटेल असं वागू नका. असा पलटवार प्रशांत जगताप यांनी केलाय.
मिटकरी… ज्यांना मतदारसंघ असतो ते मतदारसंघातील प्रश्न सोडवतात. ज्यांना मतदारसंघ नसतो ते तुमच्यासारखे रिकाम्या गावगप्पा करतात. स्वतःच्या नावापुढे “आमदार” लिहिताना लाज वाटेल असं वागू नका. https://t.co/SVDxZZ1l9N
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सुप्रिया सुळेंनी बारामतीत ठोकला तळ ; दहा महिने बारामतीतच राहणार, निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात
हेही वा“जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार, याची शाश्वती नाही”
हेही वाचा..पदाधिकाऱ्यांना ८० गाड्या घेण्यासाठी अजित पवारांकडे १५ कोटी रूपये आले कुठून ? अंजली दमानियांचा सवाल
हेही वाचा..“एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे ‘या’ महिन्यात एकत्र येणार”, शिंदे गटाच्या आमदाराने आतली बातमी फोडली
हेही वाचा.“ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही”, ठाकरेंचा हल्लाबोल, शिंदे अन् भाजपमधील नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश