छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी अलिकडच्या काळात वाढलेल्या दिसत आहेत. यातच दहा जानेवारीला शिवसेना अपात्र आमदार याचिकांवरील सुनावणीचा निकाल लागणार आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यातच अशा घटना होत असताना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे फेब्रुवारी महिन्यात एकत्र येतील असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय.
हेही वाचा…पुण्यापाठोपाठ नाशकातही महायुतीत मिठाचा खडा ; जिल्हा नियोजन समितीत अजित पवार गटाचा वरचष्मा
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकीय भेट ही जाहीरपणे घेतली जात नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकारणातील मोठा बॉम्बस्फोट असेल. सध्याच्या घडीला ते एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. परंतु राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत प्रत्येकाची आवश्यकता प्रत्येकाला भासते, त्यामुळे राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आम्हाला आनंदच होईल. असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे.
हेही वाचा….माढा लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा ; राष्ट्रवादीच्या संजीवराजे नाईक निंबाळकरांनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट
दरम्यान, शिवसेना अपात्र आमदारांवरील याचिकेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या दहा तारखेला देणार आहेत. त्याआधीच एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. एकनाथ शिंदे यांचा हा कार्यकर्ता मेळावा असून जाहीर सभा नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला जाहीर सभेचे स्वरूप देण्यात येणार नसल्याचं शिरसाठांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा.“ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही”, ठाकरेंचा हल्लाबोल, शिंदे अन् भाजपमधील नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी मागितल्या १२ जागा ; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
हेही वाचा.“राऊतांची तुलना महाभारतातील मंथरेशी ;” भाजपच्या महिला नेत्याने राऊतांना खडसावलं
हेही वाचामोठी बातमी : कल्याण, ठाणे ते धाराशिव, हातकणंगले, नाशिक, संभाजीनगर ते रामटेक, बुलढाणा, ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या!
हेही वाचा..“१० तारखेनंतर राज्यात नवा नवरदेव दिसेल ; तयारी सुरू झालीय,” विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा