सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतल्याने एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. संजीवराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्याने लोकसभेची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरूद्ध मोहित पाटील असा संघर्ष माढा लोकसभेत सध्या सुरू आहे. त्यामुळे संजीवराजे नाईक निंबाळकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढू शकतात.
हेही वाचा...“नाना पटोलेंचा प्रश्न नरेंद्र मोदींना आवडला नाही म्हणून..,” राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात
माढा लोकसभेत सध्या मोहिते पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यात संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडेही माढा लोकसभेसाठी तगडा उमेदवार नसल्याने भाजपमधील संघर्षाचा फायदा उठविण्यासाठी प्रयत्न शरद पवारांकडून केला जाऊ शकतो. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. सध्या खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांची मोट बांधली असून यात माढा, करमाळा, सांगोला आणि माण खटाव येथील चारही आमदार हे रणजित निंबाळकर यांच्यासोबत आहेत. तर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमधून २०१४ च्या मोदी लाटेत माढा लोकसभा जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती.
हेही वाचा…“तर तुम्ही खासदारकी लढवणार नाही ;”अमोल कोल्हेंना शिरूरमधील मतदारानेच दिलं खुलं चॅलेंज
दरम्यान धैर्यशिल मोहिते पाटलांनी देखील मोठा दावा केला आहे. मोहिते पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून त्यांच्या प्रवेशामुळे माढा लोकसभा मतदारसंघ भाजपला जिंकता आला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील आमदार बबनदादा शिंदे, करमाळाचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपले वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याचे चित्र आहे.
आपल्या पहिल्याच टर्ममध्ये खासदार रणजित निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुक्यातील पाण्याचे , रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्याने मतदारसंघात निंबाळकर यांचा मोठा बोलबाला असल्याची चर्चा आहे.
READ ALSO :
हेही वाचाफडणवीसांनंतर शिंदेंनीही लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं
हेही वाचा…१२+१२+१२+१२..! लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचा जागावाटपाचा फॉर्म्युला, आंबेडकराचं इंडिया आघाडीला पत्र
हेही वाचा..राष्ट्रवादी अजित पवार गटात इन्कमिंग’ सुरू, अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
हेही वाचा…पोलिसांसमोरच कोयता गॅंगचा उच्छाद ..! हाच आहे का देवाभाऊंचा सुपरफास्ट सुरक्षा पॅटर्न? रोहित पवारांचा सवाल
हेही वाचा….“पक्ष फुटलाय हे काॅंग्रेस ठरवू शकत नाही”, जागावाटपावरून काॅंग्रेस अन् ठाकरे गटात वाकृयुद्ध