नागपूर : काॅंग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेला देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. जवळपास ४० एकरवर काॅंग्रेसच्या नेत्यांची जाहीर सभा होत असून काॅंग्रेसमधील अनेक राज्यातील आजी माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी तीन व्यासपीठावर विराजमान झाले. याच व्यासपीठावरून खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा..एकनाथ शिंदे ‘ठाण्याचा वाघ’ तर देवेंद्र फडणवीस ‘फ्रायर ब्रॅण्ड’ नेते ; कुणी उधळली स्तुतीसुमने ?
देशात विचारधारेची लढाई सुरू आहे, पण ही लढाई दोन विचारधारेच्यामध्ये आहे. भाजपात राहणं सहन होत नाही. भाजपात गुलामी चालते, जे वरिष्ठ सांगतात, ते करावं लागते. आमचं कुणी ऐकतं नाही असं एका खासदारानं मला सांगितलं होतं. नाना पटोलेंनी देखील नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला होता. पटोलेंचा प्रश्न नरेंद्र मोदींना आवडला नाही म्हणून त्यांना काढण्यात आलं. असा घणाघात देखील राहुल गांधी यांनी मोदींवर चढवला.
हेही वाचा…पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ; दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, आमचं काही चुकलं तर कार्यकर्ते थेट आमच्याशी बोलतात. राजा-महाराजांच्या काळात जसा आदेश यायचा तसा आदेश भाजपमध्ये येतोय. देशातील सर्व संस्थावर भाजपानं ताबा मिळवला आहे. ईडी, सीबीआयची भीती दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. देशाच्या हितासाठी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू जेलमध्ये देखील गेले होते. भाजपने काय केलं ते त्यांनी सांगावं.? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
READ ALSO :
हेही वाचा.“तर तुम्ही खासदारकी लढवणार नाही ;”अमोल कोल्हेंना शिरूरमधील मतदारानेच दिलं खुलं चॅलेंज
हेही वाचा..“रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘नागपुर’ ही संघभूमी नाही तर दिक्षाभूमी बनवणार”,कन्हैया कुमारांनी नागपुरातली सभा गाजवली
हेही वाचा…राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! ‘या’ विषयावर झाली ४० मिनिटे चर्चा
हेही वामहेश लांडगे समर्थक विजय फुगेंचा ‘डीपीडीसी’मध्ये बंडाचा झेंडा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अखेर माघार
हेही वाचा...महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ; कुणाला कुठे आणि किती जागा मिळणार ? पाहा संपुर्ण यादी