मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राज ठाकरे यांनी सहाव्यांदा भेट घेतली आहे. तसेच मागील काही महिन्यांपासून शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळिक वाढतच चालली आहे. त्यामुळे महायुतीत मनसेही दाखल होणार का ? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत.
हेही वाचा...“काँग्रेस की रॅली है तय्यार है हम” ,लेकीन हम भी नही कुछ कम “, रामदास आठवलेंची खास कविता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई मधील वर्षा निवासस्थानी आज राज ठाकरे यांनी शिंदेंशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. या बैठकीत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रात राम उत्सव साजरा करावा याविषयी दोघांचे एकमत झाल्याचे समजत आहे. त्याचबरोबर टोल नाक्यावर मनसेच्या वतीने कॅमेरे लावले आहेत. त्याबाबतच अहवाल राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. अहवाल सादर केल्यावर मुख्यमंत्री अहवालाबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याची माहिती समोर आली आही.
हेही वाचा...“बच्चू कडू आघाडीत आले तर स्वागतच, शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट,” राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, मराठी पाट्याबाबत सरकार मनसेच्या भूमिकेला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबाबत देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली असा माहिती सुत्रांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वामहेश लांडगे समर्थक विजय फुगेंचा ‘डीपीडीसी’मध्ये बंडाचा झेंडा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अखेर माघार
हेही वाचा...महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ; कुणाला कुठे आणि किती जागा मिळणार ? पाहा संपुर्ण यादी
हेही वाचा..एकनाथ शिंदे ‘ठाण्याचा वाघ’ तर देवेंद्र फडणवीस ‘फ्रायर ब्रॅण्ड’ नेते ; कुणी उधळली स्तुतीसुमने ?
हेही वाचा.पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ; दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, नागपुरात जाहीर सभा, ४५० जणांसाठी तीन भव्य व्यासपीठ