पिंपरी । प्रतिनिधी पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी आणि विकासकामांकडे होणारे दुर्लक्ष यावरुन आमदार महेश लांडगे समर्थक सदस्य विजय फुगे यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे अन्य सदस्य आशा बुचके, आनंद नंदे आणि वासुदेव काळे यांनीही दंड थोपाटले. अखेर अजित पवार यांनी माघार घेत, प्रत्येक सदस्याला १ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले आहे.
हेही वाचा...“बच्चू कडू आघाडीत आले तर स्वागतच, शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट,” राजकीय वर्तुळात चर्चा
पुणे जिल्हा नियोजन समितीवरील शासननियुक्त, नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांनी गेल्या सात महिन्यांमध्ये बेठकीचे इतिवृत्त अंतिम न केल्याबद्दल तसेच, त्यावर कार्यवाही न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित सत्तेत आहेत. मात्र नियोजन समितीत अजित पवार गट विरुद्ध शिवसेना-भाजपा समर्थक सदस्य असा नवा वाद निर्माण झाला आहे. जिल्हा नियोजन समितीचे इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ही 800 कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार, असा इशारा भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवार यांना दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…“अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणं एवढं सोप्प नाही”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीतील सदस्यांनीच पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर आक्षेप घेतले आहे. सदस्यांकडून एक निवदेन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहे. भाजप आणि शिंदे गटातील जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांनी हा आक्षेप घेतला आहे. 800 कोटींच्या कामाचे इतिवृत्त भाजप आणि शिंदे गटातल्या सदस्यांना देण्यात आले नव्हते, असा आक्षेप सदस्यांनी घेतला आहे. यामध्ये विजय फुगे, आशा बुचके, आनंद नदे, वासुदेव काळे, बाळासाहेब अलंकार, प्रवीण काळभोर, पांडुरंग कचरे, अमोल पाखरे, जीवन लांडे यांनी लेखी तक्रारीवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच, न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता.
अजित पवार यांनी माघार घेतली पण…
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माघार घेत सर्व सदस्यांनी सूचवलेली विकासकामे मार्गी लावण्याकरिता १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले. पुणे जिल्हा नियोजित समितीमध्ये बंडाचा झेंडा हातात घेण्यासाठी आमदार महेश लांडगे समर्थक विजय फुगे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर भाजपाच्या आशा बुचके यांनीही या वादात उडी घेतली. त्यामुळे भाजपाविरुद्ध अजित पवार गट असा प्रत्यक्ष सामना नियोजन समितीमध्ये पहायला मिळत आहे. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे समर्थक सदस्यही सोबत आल्यामुळे अजित पवार यांचा गट एकाही पडला आहे.
READ ALSO :
हेही वाचा...महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ; कुणाला कुठे आणि किती जागा मिळणार ? पाहा संपुर्ण यादी
हेही वाचा..एकनाथ शिंदे ‘ठाण्याचा वाघ’ तर देवेंद्र फडणवीस ‘फ्रायर ब्रॅण्ड’ नेते ; कुणी उधळली स्तुतीसुमने ?
हेही वाचा.पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ; दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, नागपुरात जाहीर सभा, ४५० जणांसाठी तीन भव्य व्यासपीठ
हेही वाचा...“काँग्रेस की रॅली है तय्यार है हम” ,लेकीन हम भी नही कुछ कम “, रामदास आठवलेंची खास कविता