नागपूर : काॅंग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस असून नागपुरात यानिमित्ताने जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ४० एकरवर काॅंग्रेसची सभा होणार असून या सभेसाठी देशातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी काॅंग्रेसने है तयार हम अशी थिम ठेवली आहे. राहुल गांधींसह अनेक नेत्यांचे नागपूरात पोस्टर लावण्यात आले आहे. तर या अभियानावरून आता भाजपने काही सवाल केले आहेत. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास चारोळी केली आहे.
हेही वाचा..“वय अन् वास्तव माहिती नसल्यामुळे ‘त्या’ अजितदादावर आरोप करताहेत”, शालिनीताई पाटलांना अजित पवार गटाचं प्रत्युत्तर
नागपुरात होत असलेल्या काॅंग्रेसच्या जाहीर सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपुरात ठिकठिकाणी काॅंग्रेसकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरून भाजपसह अनेक विरोधी नेत्यांनी काॅंग्रेसवर टिका केली आहे. तर रामदास आठवले यांनी पुन्हा चारोळी करत काॅंग्रेसला डिवचलं आहे. काँग्रेस की रॅली है तय्यार है हम ; लेकीन हम भी नही कुछ कम; नरेंद्र मोदीजी मे बहोत ही है दम ! विरोधी पक्ष मे बैठने के लिये तयार है तुम; लेकीन सत्ता मे आयेंगे नरेंद्र मोदीजी के साथ हम !! असं म्हणत रामदास आठवले यांनी काॅंग्रेसच्या अभियानावर भाष्य केलंय.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती करणार की नाही ? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..
काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी? असं म्हणत भाजपने काॅंग्रेसला पाच सवाल विचारले आहेत. यामध्ये १) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? २) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? ३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? ४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? ५) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? असाही सवाल त्यांनी केलाय. त्यावर आता काॅंग्रेसकडून काय प्रत्युत्तर देण्यात येईल? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काँग्रेस की रॅली है तय्यार है हम ;
लेकीन हम भी नही कुछ कम;
नरेंद्र मोदीजी मे बहोत ही है दम !
विरोधी पक्ष मे बैठने के लिये तयार है तुम;
लेकीन सत्ता मे आयेंगे नरेंद्र मोदीजी के साथ हम !! pic.twitter.com/DW0QvvRafC— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) December 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा...“बच्चू कडू आघाडीत आले तर स्वागतच, शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट,” राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा.“अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणं एवढं सोप्प नाही”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा“काँग्रेसचं ‘है तयार हम’ अभियान नेमकं कशासाठी?” भाजपने काॅंग्रेसला विचारले ‘हे’ पाच प्रश्न
हेही वाचा…“देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा”, जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा सांगितला मार्ग
हेही वाचा.महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं