मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रणशिंग फुंगले आहे. काल झालेल्या शिंदे गटाच्या ऑनलाईन बैठकीत एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा घोषित करण्यात आला. यानुसार येत्या ६ जानेवारीपासून एकनाथ शिंदे संपुर्ण महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहे. पक्ष फुटीच्या प्रकरणानंतर महाराष्ट्राकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा कशा जिंकता येतील, याकडे लक्ष द्या, अशा सुचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा…“तर तुम्ही खासदारकी लढवणार नाही ;”अमोल कोल्हेंना शिरूरमधील मतदारानेच दिलं खुलं चॅलेंज
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल. आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळ पाऊल उचलून महायुतीचं सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे. महायुतीचं टार्गेट ४५ प्लस असून ते गाठण्यास काही अशक्य वाटत नसल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
हेही वाचा..“रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘नागपुर’ ही संघभूमी नाही तर दिक्षाभूमी बनवणार”,कन्हैया कुमारांनी नागपुरातली सभा गाजवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात येत्या ६ जानेवारीपासून सुरू होत आहे. यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेकमध्ये ६ जानेवारीला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यानंतर ८ जानेवारीला अमरावती आणि बुलढाणा, १० जानेवारीला हिंगोली आणि धाराशीव ११ जानेवारीला परभणी आणि संभाजीनगर तर २१ जानेवारी रोजी शिरूर आणि मावळ असा दौरा असणार आहे.
त्यानंतर २४ जानेवारीला रायगड, रत्नागिरी-सिंधूदूर्ग तर २५ जानेवारीला शिर्डी नाशिक, २९ जानेवारील कोल्हापुर, ३० जानेवारीला हातकंणगले अशा पद्धतीने पक्षाच शिबीर पार पडणार आहे. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा लोकसभेसाठी सामाना होणार आहे. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार ? ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…१२+१२+१२+१२..! लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचा जागावाटपाचा फॉर्म्युला, आंबेडकराचं इंडिया आघाडीला पत्र
हेही वाचा..राष्ट्रवादी अजित पवार गटात इन्कमिंग’ सुरू, अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
हेही वाचा…पोलिसांसमोरच कोयता गॅंगचा उच्छाद ..! हाच आहे का देवाभाऊंचा सुपरफास्ट सुरक्षा पॅटर्न? रोहित पवारांचा सवाल
हेही वाचा….“पक्ष फुटलाय हे काॅंग्रेस ठरवू शकत नाही”, जागावाटपावरून काॅंग्रेस अन् ठाकरे गटात वाकृयुद्ध
हेही वाचा...“नाना पटोलेंचा प्रश्न नरेंद्र मोदींना आवडला नाही म्हणून..,” राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात