मुंबई : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी सजली असून व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण देखील पाठवण्यास सुरूवात झाले आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सध्या राम मंदिराच्या मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपवर सातत्याने निशाणा साधतांना दिसत आहेत. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…१२+१२+१२+१२..! लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचा जागावाटपाचा फॉर्म्युला, आंबेडकराचं इंडिया आघाडीला पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामाच्या फोटोवरून मागील काही दिवसापासून संजय राऊत भाजपवर टिका करत आहेत. यातच राम मंदिर हा भाजपचा इव्हेंट आहे. राम पुन्हा वनवासात जातील, असे कोणी करू नये. राम मंदिराच्या निमंत्रणाची आम्ही वाट पाहत बसलो नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर संजय राऊतांची तुलना मंथरासोबत करत चित्रा वाघ यांनी जोरदार घणाघात चढवला आहे.
हेही वाचा..राष्ट्रवादी अजित पवार गटात इन्कमिंग’ सुरू, अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही मात्र महाराष्ट्राच्या मंथरेची भूमिका नेटाने निभावताय. मंथरा जशी रोज सकाळी उठून कैकेयीचे कान भरायची, तसे तुम्ही रोज उद्धवजी आणि तुमच्या सहकारी पंक्षाच्या नेत्यांचे काम भरत असता. वाचाळ बडबडीने महाराष्ट्राच्या जनतेचेही कान किटवत राहता. परंतु जनता भाजपमागे ठामपणे उभीय. मंथरेने जसे आपल्या मालकिणीचे नुकसान केले. तीच भूमिका या कलियुगात तुम्ही बजावताय, असा शाब्दिक हल्ला चित्रा वाघ यांनी चढवला.
भाजप कैकेयीच्या भूमिकेत आहे की रामभक्त हनुमानाच्या हे जनताच सांगेल.
सर्वज्ञानी @rautsanjay61 तुम्ही मात्र महाराष्ट्राच्या मंथरेची भूमिका नेटाने निभावताय.
मंथरा जशी रोज सकाळी उठून कैकेयीचे कान भरायची, तसे तुम्ही रोज उद्धवजी @uddhavthackeray आणि तुमच्या सहकारी पक्षांच्या…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 29, 2023
READ ALSO :
हेही वाचामोठी बातमी : कल्याण, ठाणे ते धाराशिव, हातकणंगले, नाशिक, संभाजीनगर ते रामटेक, बुलढाणा, ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या!
हेही वाचा..“१० तारखेनंतर राज्यात नवा नवरदेव दिसेल ; तयारी सुरू झालीय,” विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
हेही वाचापुण्यापाठोपाठ नाशकातही महायुतीत मिठाचा खडा ; जिल्हा नियोजन समितीत अजित पवार गटाचा वरचष्मा
हेही वाचा….माढा लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा ; राष्ट्रवादीच्या संजीवराजे नाईक निंबाळकरांनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट
हेही वाचाफडणवीसांनंतर शिंदेंनीही लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं